इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागला आहे. हा निकाल पाहिला तर कही खुशी.. कही गम.. अशीच परिस्थिती पहावयास मिळाली. काही ठिकाणी अतिशय चुरशीचा सामनाही पाहायला मिळाला परंतु इंदापूर तालुक्यात सर्वात जादा लक्ष होते ते बेलवाडी ग्रामपंचायतीवर.
हर्षवर्धन पाटील यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांच्या पत्नी मयुरी शरद जामदार हया थेट सरपंच पदासाठी उभा राहिल्या होत्या आणि यातूनच शरद जामदार यांच्या तालुकाध्यक्ष पदाची अप्रत्यक्षरीत्या प्रतिष्ठा पणाला लागली होती.
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे मातब्बर नेते शरद जामदार यांच्या पत्नीला पाडण्यासाठी सज्ज झाले होते. राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार म्हणून नेचर डेअरीचे सर्वेसर्वा अर्जुन देसाई यांची कन्या तथा तब्बल 22 वर्ष एनसीपीचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे भवानीनगर कारखान्याचे माजी संचालक कांतीलाल जामदार यांची सून नीता मयूर जामदार यांना उभा केल्याने हा निकाल एकतर्फी लागेल असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ लोकांना वाटत होते.
परंतु बीजेपीचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांची टीम तब्बल 208 मतांनी थेट सरपंच निवडणुकीत मयुरी शरद जामदार यांना निवडून आणण्यात यशस्वी झाली.
आज इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बेलवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचा राष्ट्रवादीचा उमेदवार पडला हे खूप धक्कादायक आहे कारण अर्जुन देसाई व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कांतीलाल जामदार हे दोघे मातब्बर नेते असताना उमेदवार पडेल असं वाटत नव्हतं त्यामुळे इंदापूर तालुक्यात सर्वात धक्कादायक निकाल हा बेलवाडीचा आहे असे मी मानतो असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
एकंदरीतच 4200 हून अधिक मतदार असलेल्या बेलवाडी या गावामध्ये भाजपाच्या तालुकाध्यक्षाला परिवर्तन करण्यात यश मिळाले आणि याच माध्यमातून भाजपाची तालुक्यातील ताकद वाढली असं म्हणता येईल.या ताकतीचा फायदा येणाऱ्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना होईल यात शंका नाही.
Home Uncategorized बेलवाडीचा निकाल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसाठी धक्कादायक.. बेलवाडीत सरपंचपद भाजपाकडे खेचण्यास ॲड.शरद जामदार यांची...