बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत अवसरी मध्ये बालग्राम सभेचे आयोजन.
इंदापुर: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इंदापूर १ अंतर्गत वडापुरी बीट मधील अवसरी केंद्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत बालग्राम सभेचा कार्यक्रम आज घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी अवसरी चे विद्यमान सरपंच श्री ,संदेश शिंदे ,उपसरपंच चंद्रकांत कवितके ,सदस्य सोमनाथ जगताप ,ऋतुजा मोरे ,संगीता शिंदे ,आणि आई .सी .डी .एस विभागाच्या पर्यवेक्षिका राणी जाधव ,ग्रामसेविका रूपाली व्यवहारे श्री हनुमान विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ विजया शिंगटे, अशा सेविका अर्चना माने उपस्थित होत्या. माझी कन्या भाग्यश्री योजना, आणि किशोर वयीन मुलींचा आहार व आरोग्य याविषयी राणी जाधव यांनी समुपदेशन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा सत्कारही करण्यात आला. या बालग्राम सभेमध्ये मुलींनी स्वच्छता गृह एक युनिट, आणि पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे अशी मागणी केली. या कार्यक्रमासाठी अवसरी गावांमधील बहुसंख्य मुली व स्त्रिया उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व सहकार्य अवसरी ग्रामपंचायतीने केले. व शेवटी आभार अलका जगताप यांनी मानले.