बारामती तालुक्यात चिंकारा हरणाची शिकार करताना आरोपींना रंगेहात पकडले मात्र इंदापुरातील कडबनवाडी प्रकरणातील आरोपींच्या डोक्यावर हात कोणाचा ??

इंदापूर/बारामती: गेल्या काही महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावापासून काही किलोमीटरवर अंतरावर असलेल्या बहुचर्चित कडबनवाडी या गावामध्ये चिंकारा हरणाच्या शिकारी झाल्यानंतर अजूनही आरोपी मोकाट फिरत असून वनखाते संबंधित सीसीटीव्ही चे पुरावे असतानाही आरोपी पकडत नाहीत यामुळे वनखात्याच्या कामगिरीवर नागरिकांना संशय निर्माण होत असतानाच दुसरीकडे बारामती तालुक्यात मात्र चिंकारा जातीच्या हरणाच्या शिकारी करताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहात पकडण्यात त्यांना यश मिळाले आहे सविस्तर वृत्त असे की,बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात एका चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातल्या तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून चौघा संशयितांना अटक केली आहे.
याप्रकरणी वैभव सुभाष घाडगे (वय २६) संग्राम सुनील माने (वय २७ दोघेही सातारा रोड, ता. कोरेगाव जि. सातारा) तर सुनिल मारुती शिंदे (वय ४०), दादा रामभाऊ पवार (वय ३७ रा. आबाजीनगर, पणदरे) अशी वनविभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या शिकार प्रकरणातील पाचवा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बारामती वनपरिक्षेत्रातील कर्मचारी सुभाष पानसांडे, नंदूकुमार गायकवाड, जयराम जगताप, सचिन काळे, प्रकाश लोंढे बारामती तालुक्यातील पणदरे परिक्षेत्रातील गट नंबर 435 मध्ये रात्रीची गस्त घालत असताना वनविभागात बॅट-यांच्या हालचाली जाणवल्या.कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनास्थळी छापेमारी केली. त्यावेळी संबंधित पाच आरोपी एक चिंकारा जातीचे हरीण आणि पाच सशांची शिकार करताना रंगेहात आढळून आले. वनविभागाच्या अधिकारी चाहूल लागताच यातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र, इतर चौघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. पुण्याचे उपवनसंरक्षक मयुर बोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली. चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. एकंदरीत जी तत्परता बारामती वन विभागाचे अधिकारी दाखवत आहेत त्याचे निश्चितच कौतुक आहे परंतु इंदापूर तालुक्यात वनखात्याचे अधिकारी बहुचर्चित शंकरा जातीच्या कडबनवाडी येथे झालेल्या शिकार प्रकरणात अजून कोणालाही पकडण्यात यश आले नाही (जरी सीसीटीव्ही फुटेज त्यांना प्राप्त झाले असेल तरी) म्हणून इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे अशी चर्चा इंदापूर तालुक्यात चालू आहे. या बाबतीत झालेल्या सर्व घडामोडी संदर्भात पुढील आठवड्यामध्ये एक स्पेशल एपिसोड लावणार आहोत हा एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच जनताा एक्सप्रेस मराठी न्यूज च्या चॅनल ला पुढील लिंक द्वारे  सबस्क्राईबकरा https://youtube.com/channel/UCe6MAYmBoaXevmX77q94ulw 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here