बारामती: दिनांक 14 मार्च रोजी बारामती भिगवन रोड वरील गौरव हेरिटेज हॉटेल जवळ सर्विस रोडवर बारामती येथून हर्षद नरसिंग खराडे वय 21 वर्ष रा. मोसे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या व्यक्तीचा मोबाईल तीन अज्ञात चोरट्यांनी टू व्हीलर गाडीवरती येऊन मारहाण करून हिसकावून घेऊन चोरून नेले बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 140 / 22 भादवि कलम 394 ,323, 504 ,506 ,34 प्रमाणे बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री धोत्रे साहेब व गुन्हे शोध पथक बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस हवा. राम कानगुडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत हे करीत होते दिनांक 20 मार्च रोजी राम कानगुडे यांना मिळालेल्या गुप्त बातमी द्वारे मोबाईल चोर व गाड्या चोरणारे गुन्हेगार बारामतीत येत असल्याचे माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मोठ्या शिताफीने 1. रोहन अभीदास माने वय 20 वर्ष रा. सूर्यनगरी बारामती जिल्हा पुणे. 2 . जयेश अशोक मोरे वय 19 वर्षे रा.तांबे नगर बारामती जिल्हा पुणे 3. ऋतिक विठ्ठल विरकर वय 21 वर्ष राहणार तांबे नगर बारामती जिल्हा पुणे सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून चोरून नेलेला सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड गॅलेक्सी एम 51मोबाईल व गुन्ह्यांमध्ये वापरलेली नवीन हिरो होंडा शाईन गाडी आरोपी यांच्याकडे मिळून आली आहे. हे चोरटे बऱ्याच दिवसापासून मोबाईल व टू व्हीलर चोरत होते त्यांच्यावरती वेगवेगळ्या कायद्यान्वये बारामती तालुक्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशा अटटल चोरट्या गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडण्याचे काम पोलीस निरीक्षक श्री ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय धोत्रे पोलीस हवा. राम कानगुडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत महेश कळसाईत , अमोल नरूटे व नितीन कांबळे यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पीएसआय धोत्रे हे करीत आहेत.