बारामती प्रतिनिधी: संदीप आढाव
बारामती : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून बारामती येथे मनसेकडून प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.
यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.पोपटराव सूर्यवंशी, तालुका प्रमुख अॅड.निलेश वाबळे, उपप्रमुख ऋषिकेश भोसले,प्रविण धनराळे, स्वप्निल मोरे, सोमनाथ पाटोळे,अतुल कुंभार, अक्षय कदम, शिवप्रतिष्ठान चे संग्रामसिंह जाचक इत्यादी उपस्थित होते.