बापू बोराटे यांची माळी महासंघ पत्रकार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

पुणे:इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक कार्यात पुढे असणारे तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करत असलेले , काॅंग्रेस ओबीसी सेलचे इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांची माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश पत्रकार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
बापूसाहेब बोराटे हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत या क्षेत्रात काम करीत असताना गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणी द्वारे, आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात, आपल्या बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करून वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरत असतात ,सर्व पत्रकारांमध्ये एकजूट असावी यासाठी ते सतत प्रयत्न करीत असून त्यांची काम करण्याची तळमळ व मेहनत पाहून माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे,माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, विश्वस्त राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूराम आण्णा गायकवाड व पत्रकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अतुल क्षिरसागर यांनी बापूसाहेब बोराटे यांची माळी महासंघ पत्रकार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आणि त्यांनी नियुक्ती बद्दल पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार समितीचे सदस्य ॲड नितीन राजगुरू व महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडीचे महासचिव मुरलीधर भुजबळ यांनी बापूसाहेब बोराटे यांची या पदावर नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली होती, आणि निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत
बापूसाहेब बोराटे यांच्या निवडीनंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच बरोबर समाज बांधव यांच्या कडून ही त्यांचें अभिनंदन करण्यात येत आहे. तडका महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक नानासाहेब ननवरे यांनी माळी महासंघाचे विशेष आभार मानले आहेत आणि बापूसाहेब बोराटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच निवडीनंतर इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी, राज्य मराठी पत्रकार संघ, शिवसेना इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे,साई कंट्रक्शन चे सर्वेसर्वा माणिक भोंग, शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, माळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष चंद्रकांत वाघोले, झगडेवाडी गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब झगडे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय माळी, माळी महासंघाचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास शिंदे, युवा नेते किरण वाघ, महादेव शिंदे, विशाल सावंत आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here