इंदापूर प्रतिनिधी:सचिन शिंदे
निमगाव केेेतकी :जनहित कला व क्रीडा ट्रस्ट,जनहित पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने बापुसाहेब आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 3 वर्षांपासून कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदाने न झाल्यामुळे कुस्तीगीर व कुस्तीचे चाहते यांच्या मते कुस्ती संपते की काय अशी परिस्थिती तयार झाली होती. परंतु कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे जनहित कला व क्रीडा ट्रस्टचे अध्यक्ष पै. अस्लम मुलाणी व त्यांचे सर्व सहकारी, कुस्ती कोच संभाजी पवार,महादेव मेटकरी यांनी भव्य अशी बक्षिसे ठेऊन कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले.
या स्पर्धे साठी बारामती ,दौंड, इंदापुर या भागातून बहुसंख्य कुस्तीगीर व कुस्तीप्रेमी उपस्थित राहिले .स्पर्धेत 17 गटात स्पर्धा झाल्या त्यातील 10 गट मुलांचे व 7 गट महिलांचे होते.या स्पर्धेत महिलांच्या कुस्त्या खास आकर्षण ठरल्या. व या कुस्ती स्पर्धे साठी महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती.
या कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज भाऊ जाधव,निमगाव केतकी मा. तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय आण्णा चांदणे ,वस्ताद सिकंदर मुलाणी , मचींद्र आप्पा चांदणे,भारत मोरे,वसंत घाडगे,अशोक चोरमले,वस्ताद हनुमंत पवार,निमगाव केतकी चे माजी उपसरपंच सचिन चांदणे,वस्ताद सचिन बनकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव,वस्ताद बबलु पठाण,उद्योजक जाकिर मुलाणी,मोहसिन मुलाणी, PSI सुरेश घाडगे.जनहित पतसंस्थेच्या संचालक अनिसा मुलाणी,सुरेखा चांदणे, दिलअफरोज मुलाणी,नंदिनी करे. तसेच पंच म्हणुन शरद झोळ सर,संभाजी पवार,रवी बोत्रे सर,अनिता गव्हाणे मॅडम ,अशोक बंडगर,अशोक करे यांनी पंच म्हणुन काम पाहिले.
कुस्ती स्पर्धे मध्ये बापुसाहेब आंतरराष्ट्रीय संकुल निमगाव केतकी वस्ताद अस्लम मुलाणी व कोच महादेव मेटकरी यांच्या मल्लांनी सांघिक विजेतेपद पटकावले.