आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आम्ही शिवसेनेतच राहणार असे युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले. . एकनाथ शिंदे सह अनेक आमदार शिवसेनेतून फुटून भारतीय जनता पार्टी यांना पाठिंबा देऊन सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न देखील होत आहे. परंतु सत्ता असो किंवा नसो सर्व शिवसैनिक शिवसेने बरोबरच राहणार असे सांगत आम्ही बाळासाहेब यांच्या भगव्या विचारावर चालणारे कडवे शिवसैनिक आहोत. कोणीही कुठेही गेले तरी सोलापूर जिल्ह्यातील युवासैनिक व शिवसैनिक उद्धव साहेबा बरोबर प्रामाणिक राहणार अशीच भूमिका सर्व शिवसैनिकांची आहे. या सर्व बंडखोरी करणाऱ्यांनी परत धनुष्यबान या चिन्हावर निवडून येऊनच दाखवावे असे आवाहन सचिन बागल यांनी केले .सचिन बागल हे अतिशय कडवे शिवसैनिक म्हणून सोलापूर जिल्ह्यात ओळखले जातात. ते सोलापूर जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.