प्रशासकिय कामाचा आदर्श म्हणजे विश्वास पावडे- गटशिक्षणाधिकारी मोहीते

पालघर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी तथा नवली केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वास कृष्णा पावडे हे नियतवयोमनानुसर 31 डिसेंबर 2022 रोजी 39 वर्षे 6 महिने सेवा करून सेवानिवृत्त झाले. 1983 ला शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले, 2004 पासून केंद्रप्रमुख म्हणून कार्य केल्यानंतर अलीकडे त्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली.2007 पासून पालघर येथील नवली केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम करताना विद्यार्थी गुणवतेबरोबरच ,विद्यार्थी पटसंख्या वाढ,शिक्षकांचे प्रशिक्षण ,शाळांमधील भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे या कामाबरोबरच शिक्षण विभागातील प्रशासकीय कामे ,सर्वशिक्षा अभियान ,शिक्षकांची संखिकी माहिती,आर्थिक बजेट ,या सारखी अनेक कामे केली,विश्वास पावडे म्हणजे शिक्षण विभागातील मानवरुपी संगणक होते.कोणतीही माहिती ,आकडेवारी सहजरीत्या केंव्हाही सांगत होते,अत्यंत कार्यतत्पर,हुशार ,बुद्धिमान आणि प्रशासकीय कामातील मोठा अनुभव अशी त्यांची ओळख होती.सेवापूर्ती कार्यक्रमास त्यांच्यावर प्रेम करणारा ,त्यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग ,अधिकारीवर्ग उपस्थित होता.त्यांचा मित्र परिवार, कुटुंब आणि सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक वक्त्यांनी त्यांच्या प्रती भावना व्यक्त करताना त्यांच्या कामाचा,सहकार्य वृत्तीचा उल्लेख केला.
पालघर येथील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहीत वर्धक मंडळाच्या कै.गोविंदराव ठाकूर सभागृह नवली येथे कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here