कुर्डूवाडी (प्रतिनिधी: नशीर बागवान)-मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव निम्मित कुर्डुवाडी येथील पोस्ट रोड येथे सोलापूर जिल्हा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख युवा मंचच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. त्यावेळी कुर्डुवाडी मधील सर्व प्रतिष्ठित व्यापारी वर्ग व राजकीय नेते उपस्थित होते.जन्मोत्सव करीता कुर्डुवाडी मधील सर्व प्रमुख ठिकाणी तसेच सर्व छोट्या मोठ्या गल्ली मध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लावण्यात आले कुर्डुवाडी येथील भाजप जिल्हाप्रमुख श्री संतोष क्षीरसागर युवा मंच तर्फे माजी पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तसेच बाहेरून आलेल्या नागरीकांना महाप्रसाद व सरबत वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला हार पुष्प वाहून तसेच प्रभू श्रीरामाची महारती करून करण्यात आली.सर्वत्र प्रभू श्रीरामाच्या जन्माचा आनंदमय वातावरण करण्याचं काम संतोष क्षीरसागर युवा मंच यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केले,महाआरती साठी कुर्डुवाडी मधील राजकीय मंडळीत मनोज नाना धायगुडे ,भिसे मालक,भाजप जेष्ठ नेते गोविंद आबा कुलकर्णी,मनसे चे युवराज कोळी,दर्शन शर्मा,विकी इंगोले ,हरीभाऊ बागल,अर्षद मुलाणी तसेच व्यापारी वर्गातून राजकुमार धोका,अतुल दोशी, लक्ष्मीकांत क्षीरसागर, रवी नलवडे ,हिरो शोरूमचे मालक गणेश क्षीरसागर,निलेश संचेती,आनंद कोठारी,वेदपाठक आदी लोक उपस्थित होते.यावेळी नसीर बागवान, रावसाहेब मुसळे, लक्ष्मण पवार,शिवराज पवार या सर्वांचे फेटे बांधून सत्कार करण्यात आला.