पोलीस पाटील कार्यशाळा स्नेह मेळावा व पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न.

उपसंपादक निलकंठ भोंग
इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वतीने पोलीस पाटील कार्यशाळा, स्नेह मेळावा व नवीन कार्यकारणी पदग्रह समारंभ दि.३० जुलै हॉटेल स्वामीराज, हॉल सरडेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस व महसूल प्रशासनाचा गाव पातळीवरील असलेला प्रतिनिधी प्रशिक्षित व्हावा त्यांना प्रचलित कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने इंदापूर पोलीस पाटलांनी कार्यशाळेचे व स्नेह मेळाव्याचे आयोजित केले होते. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्यांनी पोलीस पाटील कायदा व त्याची अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये कायदा कितीही सर्वश्रेष्ठ असला तरी तो वापरणारे लोक चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करत असतील, वापर करत नसतील तर तो कायदा निरर्थक ठरतो. असे विचार व्यक्त केले. त्याप्रमाणेच ग्राम पोलीस कायद्याचे अंमलबजावणी होत नसल्याने पोलीस पाटलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे असे नमूद केले. पोलीस पाटलांनी संघटितरित्या आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी संघटित राहून होणाऱ्या अन्यायाची दाद मागितली पाहिजे. याकरता संघटनेची आवश्यकता आहे.
म्हणून इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांनी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना असोसिएशन व संघटनेचे राज्याध्यक्ष महादेवराव नागरगोजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कार्यक्रमास महादेव नागरगोजे पाटील दिलीप (आबा) पाटील सांगोला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप पोळ पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन सोमनाथ सोनवणे पाटील यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील राऊत, विजयकुमार करे, अरुण कांबळे, बाळासाहेब कडाळे, अतुल धनवडे, भारत मारकड, परमेश्वर ढोले यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here