कुर्डुवाडी:(प्रतिनिधी:नसीर बागवान )कुर्डुवाडी येथे पै. निजाम शेठ मुलाणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक नेते वसीम भाई मुलाणी यांनी पै.अकील बागवान यांच्या स्मरणार्थ मोफत पिण्याच्या पाण्याची सोय चेक नाका बाल उद्यान समोर करण्यात आली . यामुळे सर्वांना स्वच्छ व थंड पाणी पिण्याची सोय होणार आहे .यावेळी या पाणपोईचे उद्घाटन पै.आकील बागवान यांच्या मातोश्री च्या हस्ते करण्यात आले. चेक नाका परिसर अतिशय गजबजलेला असतो .त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची पिण्याची पाण्याची सोय व्हावी या यासाठी या संस्थेचे अध्यक्ष वसीम भाई मुलाणी यांनी रमजान महिना सुरू असताना. स्वतःचे उपवास असताना देखील सर्वांची तहान भागावी यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सर्वांसाठी सोय केली आहे .यावेळी तिरंगा ग्रुपचे अध्यक्ष हर्षद भाई मुलाणी आरपीआय नेते अमर माने आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे अझर पठाण नजीर बागवान वाजिद बागवान आरिफ बागवान मुजाहिद मुलानी असलम बागवान अनेक जण उपस्थित होते.