पेयजल योजनांचे निष्कृष्ट दर्जाचे काम चौकशीची मागणी. दौंड(दौंड ता.प्रतिनिधी: गणेश खारतुडे) दौंड तालुका बिरोबावाडी-दौंड पाटस गावातून विभक्त करून बिरोबावाडी ग्रामपंचायत स्थापन केली त्याच ग्रामपंचायतला आज जवळ जवळ 7 वर्षे झाली या ग्रामपंचायत वर 2018-19 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. यामध्ये शासनाने 78 लाख रुपये खर्च टाकण्यात आला काम चालू केले पूर्ण केले .तरीही योजनेच्या नावाखाली ग्रामपंचायत मधून खर्च का करण्यात आला आहे?असा प्रश्न सरपंच सोनवणे यांना केला असता कॉन्ट्रक्टर खर्च करत नाही .पाण्याची गळती थांबण्यासाठी आम्ही खर्च केला त्यासाठी पाईप वॉल यासाठी 70585,31034 रुपये अशी ग्रामपंचायत मधून बीले काढून खर्च करण्यात येतो तर शासनाचा निधी गेला कोठे स्क्रिम ग्रामपंचायतच्या ताब्यात न देता खर्च का करावा लागतो? असा प्रश्न उपस्थित ग्रामस्थांनी केलेला आहे.पेयजल योजनेंतर्गत कॉन्ट्रक्टर खालटकर यांना ते टेंडर दिले होते ते त्यांनी केले पण टाकीचे काम निकृष्ट झाले अशी तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी दौंड यांच्याकडे 17/01/2022 ला लेखी स्वरूपात केली तरीही अधिकाऱ्यांनी त्यांचे निवारण, चौकशी केली नाही यानंतर 03/03/2022 रोजी महेश खारतुडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे संबधीत अधिकारी व कॉन्ट्रक्टर यांनी खरच भ्रष्टाचार केला आहे का यावर चौकशी स्थापन करण्यात यावी हे तपासून त्यावर कार्रवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे.आता या सर्व बाबतीत आपल्या जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल कडून सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याने नागरिकांना जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल कडून याबाबतीतील न्यायाची अपेक्षा आहे.दौंड, इंदापूर,करमाळा, माढा, तालुक्यातील लोकांना आनंदाची बातमी आता उजनी जलाशयावर होणार हवाई विमानतळ पुढील लिंक ओपन करून बघा सविस्तर-https://youtu.be/99ET1xSrEXo