पूण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या आईबरोबर शारिरीक संबंध ? मुलीशी लग्न लावून देण्यासाठीही दिली धमकी ? गुन्हा दाखल.

पुणे : पुण्यात महिलेसोबत 6 वर्षे शारिरीक सबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेचा छळ करुन 20 वर्षाच्या मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी तगादा लावला.तसेच मुलीसोबत लग्न लावू दिले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात घडल्याचा आरोप केला आहे.हा सर्व प्रकार करणाऱ्या व जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नासीर सलाम सौदागर (वय 30, रा. संविधान चौकाजवळ, वानवडी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड येथील एका 40 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून आक्टोबर 2015 पासून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले.
त्यानंतर फिर्यादी सोबत लग्न न करता फिर्यादी यांची 20 वर्षाची मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी फिर्यादीचा मानसिक छळ केला.
फिर्यादीची फसवणूक करुन फिर्यादीचे मुलीबरोबर लग्न लावून दिले नाही तर त्याच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्याने फिर्यादी यांना दिली.
या छळाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हिंदू एकता आंदोलन पक्षाने या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अमृता कोतकर म्हणाल्या की, अश्या व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे,प्रत्येक स्त्री चा सन्मान करणे व तिला संरक्षण देणे ही समाजातील सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here