पुण्यातील गँगवार गोळीबार प्रकरणात 2 जणांचा मृत्यू ,1 जण गंभीर. कसे घडले हे प्रकरण वाचा सविस्तर.

सचिन शिंदे : प्रतिनिधी

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गँगवारचा थरार पहिला मिळाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये संतोष जगताप यांचा मृत्यू झाला तर संतोष जगताप यांनी जखमी अवस्थेत प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती मिळाली की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर चर्चा करत होते. रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

या हल्ल्यानंतर संतोष जगताप याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तसेच शेजारील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील या देखील घटनास्थळी गेल्या आहेत. टोळीयुध्दातून फायरिंग झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वाळुची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं प्राथमिक माहिती आहे.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here