प्रतिनिधी: प्रवीण पिसे
रविवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या १११ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. बोरी गावचे सुपुत्र प्राथमिक शाळा जगतापवस्ती शाळेचे आदर्श शिक्षक श्री.बबन जगताप सर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करणेत आले.सुप्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर हे या समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही घटनाकारांनी दिलेली संविधानमूल्ये गुणिजनांनी प्राणपणाने जपावीत, असे आवाहन त्यांनी आपल्या बीजभाषणात केले. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सौ. मोनिका गोडबोले-यशोद या सोहळ्याला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विशेष शिक्षणातील त्यांच्या अनुभवसिद्ध भाषणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ. मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी श्री. प्रकाश सावंत, श्री. लक्ष्मणराव दाते, श्री. अमोलराव सुपेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली.
Home Uncategorized पुणे शहरातील गुणिजन गौरव महासंमेलनात १११ गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान.