इंदापूर : नवी दिल्ली येथे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हजारो युवक-युवती, पदाधिकाऱ्यांनी आणलेले गावोगावच्या पवित्र मातीचे अमृत कलश पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी कर्तव्य पथ, नवी दिल्ली कार्यक्रमाच्या संयोजकांकडे मंगळवारी (दि.31) सुपूर्द करण्यात आले.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्रातील गावा-गावाचे अमृत कलश घेऊन राज्यातून हजारो युवक-युवती विशेष रेल्वे गाडीने नवी दिल्ली येथे दाखल झाल्या. यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी सर्वांचे स्वागत केले व सोबत आणलेले पवित्र अमृत कलश हे कर्तव्य पथ नवी दिल्ली येथे होत असलेल्या कार्यक्रमाकरिता संयोजकांकडे सुपूर्द केले.यावेळी तेजस देवकाते, स्वप्निल मोडक, प्रतिक म्हेत्रे, गोविंद देवकाते, वैभव सोलनकर, स्वप्निल गुणवरे पाटील, अमोल इंगळे, नितीन ताकवले, सागर आटोळे, किशोर आटोळे व इतर उपस्थित होते.