पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन चेअरमनपदी कोण? अजित दादांची खरी कसरत आता.

यवत : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी शनिवार (दि. १५) रोजी निवडणूक होत आहे. या जिल्हा बँकेवर २१ पैकी १९ जागा जिंकत महा विकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे संपूर्ण प्राबल्य बँकेवर असल्याने राष्ट्रवादी कडून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे संपूर्ण अधिकार पालकमंत्री अजित पवार यांना असणार असल्याने या निवडणूकीत नव्याने निवडून आलेल्या उमेदवाराला संधी मिळणार का ? पुन्हा अध्यक्षपद हे जुन्या अनुभवी नेतृत्वाकडे सोपवले जाणार का ? याबाबत उत्कंठा वाढली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यात नव्हे तर देशातील अग्रगण्य असणारी जिल्हा बँक आहे. अकरा हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या या बँकेची गणणा राज्यातील अग्रगण्य अशा सहकारातील बँकांत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बँकेची सर्व सूत्रे गेली ३०वर्षापासून म्हणजे १९९१ पासून सांभाळीत आहे. शेतकऱ्यांना • टक्के व्याजदराने पिक कर्ज उपलब्ध करुन देणे ते सहकारी बँक, पतसंस्था ठेवी तसेच सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची उपलब्धता अशी या बँकेची ठळक कामगिरी आहे. गत पाच वर्षे माजी आमदार रमेश थोरात यांच्या अध्यक्षपदाखाली बँकेने गत वर्षी पावणे तीनशे कोटींचा नफा मिळवून बँकेचा कारभार अग्रस्थानी ठेवला आहे.
अशाच पद्धतीचा अग्रेसर कारभार आता बँकेची सुत्रे सांभाळणाऱ्या अजित पवार यांना अभिप्रेत असणार आहे. या निवडणूकीत त्यांनी उर्वरीत ७ जागांच्या झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभेत सहभागी होऊन त्यांनी बोलून दाखविला आहे. या निवडणूकीत त्यांनी ७ जागांचा पॅनेल उभा करणाऱ्या भाजपला जिल्हा बँकेतून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सहकारी बँका व पतसंस्था ‘क’ वर्ग गटात भाजपचे प्रदिप कंद हे अजित पवार यांचा मोठा विरोध काढून विजयी झाल्याने हे विजयाचे समिकरण गृहीत धरुन पवार हे जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष निवडणार हे पण नक्की झाले आहे..गटात भाजपचे प्रदिप कंद हे अजित पवार यांचा मोठा विरोध मोडीत काढून विजयी झाल्याने हे विजयाचे समिकरण गृहीत धरुन अजित पवार हे जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष निवडणार हे पण नक्की झाले आहे.
पुणे जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची माळ ही मावळते अध्यक्ष थोरात यांच्या गळ्यात पडणार की, त्यांच्या जागी नव्या नेतृत्वाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, कारण अजित पवार यांच्या दृष्टीने दौंड विधानसभा मतदारसंघात गत निवडणूकीत काठावरुन पराभव झालेल्या रमेश थोरात यांना बँकेचे बळ देऊन गमावलेली जागा परत मिळविण्यासाठी या ठिकाणी थोरांत यांना संधी देणे ही एक व्यूव्यरचना ठरु शकणार आहे. दौंडची जागा गमावल्याची मोठे शल्य अजित पवार यांच्या मनात कायम आहे. त्यांनी प्रचारसभेत बोलविले नाही म्हणून थोरात यांच्या पराभवाचा कित्ता पुढे केल्याने अनुभवी थोरात यांना संधी मिळणार का ? हे पाहणे महत्वाचे आहे.
तर दुसरीकडे प्रथमच जिल्हा बँकेची पायरी चढलेल्या आमदार अशोक पवार यांना संधी मिळणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात अशोक पवार यांना प्रदिप कंद यांचे प्रबळ आव्हान असणार असल्याने आ. पवार यांना संधी देऊन प्रदिप कंद यांच्याकडे येणाऱ्या गर्दीचा ओघ कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. जिल्हा बँकेत प्रदिप कंद यांच्या विजयाची दखल राज्यभर घेतल्याने आ. अशोक पवार यांना खुराक म्हणून आ. पवार यांना संधी देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, मात्र आमदारकी, जिल्हा बँक व कारखाना हे सत्ताकेंद्र एकावेळी सांभाळणे कठिण बाब ठरणार असल्याने अजित पवार नेमकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार म्हणून चर्चेला येत असताना रमेश थोरात व अशोक पवार हेच जिल्हा बँकेचे अध्यपदाचे सर्वाधिक दावेदार असणार आहे. याा सर्व गोष्टींचा विचार करता पुणेे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नूतन चेअरमन कोण असणार याबाबत अजित पवार यांना कसरत करावी लागणार हे नक्की.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here