” पिवळे कार्ड ” या लघुपटाचे चित्रीकरण केलेल्या लखन क्षीरसागर व संदीप रिकिबे यांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार जाहीर.

कुर्डुवाडी प्रतिनिधी: नसीर बागवान
कुर्डुवाडी:बायोस्कोप सिने फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित कोलकता पश्चिम बंगाल येथे झालेल्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या अभिनय फिल्म प्रॉडक्शन कुर्डुवाडी निर्मित ” पिवळे कार्ड ‘ या लघुपटाचे चित्रीकरण केलेल्या लखन क्षीरसागर व संदीप रिकिबे या दोघा छायाचित्रकारांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार जाहीर झाला आहे.
या चित्रपटात शासकीय योजनेत लाभ मिळवण्यासाठी व्यसनाधीन झालेल्या जयसिंग या तरुणांची व्यथा व कथा २० मिनिटांच्या लघुपटात मांडण्यात आली आहे.पिवळे कार्ड मिळवण्यासाठी एजंट ग्रामसेवकाची भेट घडवतो.कार्ड मिळवेपर्यंत व्यसनाच्या आहारी जातो.व्यसनामुळे त्याचे यकृत खराब होते .आणि उपचारासाठी शेवटी पिवळे कार्डच उपयोगी पडल्याचे दाखवण्यात आले आहे.
सुनिल गुरव यांची संकल्पना असलेल्या चित्रपटाची कथा, पटकथा लिहण्या बरोबर ग्रामसेवकाची भूमिका अंकुश आतकर, एजंट व दिग्दर्शनाची धुरा भारत आवताडे यांनी सांभाळली आहे जयसिंगच्या भूमिकेत अमर पंचिरे,सरपंच शामराव पाटील, जयसिंगच्या पत्नीच्या भूमिकेत मेघा आगावने, जयसिंगच्या वडिलांची भूमिका शामराव करळे,डॉक्टरची भूमिका डॉ.संतोष सुर्वे ,उपसरपंच संतोष शेलार ,ग्रामपंचायत सदस्य म्हणून दिनकर मोरे व राजेंद्र राऊत , बारलोणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय लोंढे , अजिनाथ हनवते व भोलाची भूमिका बालाजी लुक्कड यांनी साकारली आहे.यज्ञेश लुक्कड या बालकालाकरासह ल घुपटातअन्य ग्रामस्थ व सहकलाकारांचा समावेश असून सह निर्माता ऋषिकेश क्षिरसागर संकलन ऋतिक गायकवाड तर कार्यकारी निर्माता म्हणून प्रसाद आतकर यांनी काम पाहिले आहे.
या लघुपटातील सर्व कलाकार बारलोणी व कुर्डुवाडी शहरातील आहेत ,२० मिनिटांच्या या लघुपटाचे चित्रीकरण कुर्डुवाडी व बारलोणी ता.माढा येथे करण्यात आले आहे.स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र हे पारितोषिकाचे स्वरूप आहे.कोलकता (पश्चिम बंगाल )येथे समारंभपूर्वक ऑनलाइन प्रदान करण्यात येणार आहे. कुर्डुवाडीतील पारितोषिक मिळालेला हा पहिलाच लघुपट असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here