पिंपरी खुर्द (सुगाव) ला बस सेवा सुरू करण्याची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन.

इंदापुर तालुका प्रतिनिधी
इंदापूर ते पिपरी खुर्द (सुगाव) बस सेवा पूर्वीप्रमाणे चालू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या काळ व नंतर एस. टी. संपामुळे पिंपरी खुर्द (सुगाव) फे-या बंद झाल्या होत्या. परंतु आता कोरोना कमी झाला असून एस. टी. चा संप देखील मिटला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एस. टी. सुरु झालेली आहे. उद्यापासून शाळा कॉलेज सुरु होणार असल्यामुळे सध्या एस. टी. चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे सध्या पाऊस सुरु होत असून शेतक-यांना सुद्धा त्याची गरज आहे. तरी लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे एस. टी. ची सेवा चालू करावी हि विनंती आगार प्रमुखांना करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रफुल्ल पवार, इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस नाना भोईटे, शिरसोडी वि.का. सेवा सोसायटीचे रमेश पेटकर, युवा नेते सतीश नरुटे, उपसरपंच सुनील मोहिते-पाटील, विशाल पवार आदी उपस्थित होते.
चौकट: उद्यापासून सर्व शाळा शाळा कॉलेज चालू होत असल्यामुळे एसटी बंदच्या काळात ज्या गावातील बस सेवा खंडित झाल्या होत्या त्या येणाऱ्या सोमवार पासून पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-महेबूब मणेर
एसटी आगार व्यवस्थापक
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here