वैभव पाटील :प्रतिनिधी
पालघर ठाणे जिल्हा मध्यामिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी मर्यादित सफाळे या संस्थेच्या वसई शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदार संघाचे लाडके आमदार बाळाराम पाटील, पतपेढी व संघटना समन्वय व समिती अध्यक्ष मायकल घोनसल्वेस,संघटना अध्यक्ष गणेश प्रधान,पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे , कार्यवाह के. डी.पाटील,संघटना सचिव नामदेव पाटील ,उपाध्यक्ष जयंता पाटील,कोषाध्यक्ष विनोद मिश्रा ,पतपेढी संचालक घनश्याम नेमाडे, डेरल डिमेलो,रखमा ढोणे, सुचित्रा पाटील,प्रगती पाटील,राम पाटील,रवींद्र ठाकूर ,सुहास पारधी ,विवेक प्रधान, तसेच संघटना व पतपेढी चे आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसई येथील दिवाण टॉवर मध्ये ५८०चौ. फूट क्षेत्रफळाची ५७३७५०० किमतीची सदनिका खरेदी करण्यात आली आहे.गेल्या १० वर्षां पासून वसई विभागातील सभासदांची नवीन कार्यालय खरेदीसाठी मागणी होत होती.या अनुषंगाने पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे यांनी सभासदांच्या सोईसाठी मोठे कार्यालय खरेदी केल्याचे खास नमूद केले.आज मितीस संस्थेची स्वामालकीची ५ कार्यालये व पालघर येथे शिक्षक भवन उभे केले आहे.आज माझा शिक्षक आर्थिकदृष्ट्या सबळ झाले आहेत त्यांचे जीवनमान उंचावले ,आमची मुले उच्च शिक्षण घेत आहेत,परदेशी शिक्षण घेत आहेत ह्या मध्ये पतपेढी चा मोठा सहभाग आहे.पतपेढीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा या नूतन वास्तूच्या रूपाने रोवला गेला आहे.
Home Uncategorized पालघर ठाणे जिल्हा मध्यामिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी संस्थेच्या वसई शाखेच्या नूतन...