आज सद्य स्थितीत चालू असलेल्या पालखी महामार्गाबाबत पवन घोगरे यांनी प्रकल्प संचालकांना एक निवेदन दिले आहे.त्या निवेदनात पवन घोगरे म्हणतात की,”केंद्र सरकारचा प्रकल्प संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्ग 965 या पालखी महामार्गाचे काम इंदापूर ते सराटी चालू आहे ते काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे पण जे काम चालू आहे त्याठिकाणी अपघात होऊ नये म्हणून जी काळजी ठेकेदार किंवा कंपनीने घेतली पाहिजे ती योग्य प्रकारे घेतली जात नाही असे निदर्शनास आले आहे यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे याकरिता
१) जेथे काम घालू आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे असा बोर्ड असावा.
२) ज्या ठिकाणी रस्ता खोदकाम चालू आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूस पोत्यांमध्ये माती भरून त्यावरती मोठे गोलाकार पद्धतीने रेडियम चे स्टिकर लावावे.
३)अत्यावश्यक ठिकाणी बॅरिकेट्स लावावे
४) आवश्यक ठिकाणी कापडी झेंडे लावावे तरी वरील सूचनांचा आपण विचार करावा” अशा प्रकारचे निवेदन पवन घोगरे प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांनी प्रकल्प संचालक पंढरपूर यांना दिले आहे.
एका बाजूला पालखीमहामार्गाचे काम जोरात चालू असतानाच पवन घोगरे यांनी दिलेले निवेदन लक्षवेधी व भविष्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालणारे ठरणार आहे.