पाटस भागात शेतीसाठी पाण्याची टंचाई,शेतकऱ्यांचे उपअभियंता यांना साकडे.

पाटस (प्रतिनिधी: गणेश खारतूडे)पाटस परिसरात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने येथील शेतकऱ्यांनी पाटस येथील उपअभियंता श्रीटकले साहेब यांची समक्ष भेट घेऊन पाठीमागील पाणी लवकर आल्याने व परिसरातील सर्व ऊस तोडणी चालु असल्याकारणाने पिकांना पाणी देण्यात आले नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते व नंतर पाऊस झाल्याने पिकांना पाणी देता आले नाही त्यामुळे पाण्याची समस्या लवकर जाणवू लागली याच कारणास्तव पाटस परिसरातील शेतकरी शितोळे आबा ,नितीन शितोळे, सचिन शितोळे, संभाजी देशमुख, कोकाटे, गटकळ, म्हस्के यांनी पाणी सोडण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून रोटेशन प्रमाणे पाणी मिळावे अशी मागणी केली.यानंतर लेखी निवेदनाद्वारे बेबी कॅनॉल चे पाणी27 क्रमांक पर्यंत उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी केली असता टकले साहेब यांनी वरीष्ठांना भेटा असे सांगण्यात आले त्यानंतर शेतकरी वर्ग सिंचन भवन पुणे येथे बेबी कॅनॉल च्या पाणी पुरवठासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here