सचिन शिंदे: इंदापूर ता. प्रतिनिधी.
इंदापूर – राजेंद्र विविध कार्यकारी सोसायटी बंबाडवाडी,हर्षवर्धन पाटील विविध कार्यकारी सोसायटी चिखली यांच्यावतीने पोलीस हवालदार संदीप कदम यांचा पाटस दरोडा प्रकरणात गुन्हेगारांना पकडण्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते व पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. इंदापूर अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक विलास आण्णा माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कोरोना योद्धा म्हणून डॉ. तुकाराम गोरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी पै. नितीन काका माने,पी.एस.आय लकडे साहेब,अँड.विजय पांढरे,लासुर्णे ग्रामपंचायतचे सदस्य अमित चव्हाण,अनिल रणवरे,भालचंद्र चव्हाण,प्राचार्य गणेश घोरपडे, बापूराव पांढरे,सचिव सुनील माने, सुधीर तनपुरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पवार यांनी केले.