पाटस ता दौंड येथील संदीप घोले या तरुण शेतकऱ्याने कांद्याबाबत एक नवीन पॅटर्न विकसित करून देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावचा हा तरुण शेतकरी आहे. त्याने कांद्याचे नवे ‘संदीप वाण’ विकसित केले असून या वाणाची टिकवणक्षमता 7 ते 8 महिने इतके आहे. त्यासोबतच या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे. विशेष म्हणजे या संशोधनासाठी संदीप घोले यांना 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. अनेकदा कांद्याचे बियाणे खरेदी करताना बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. ही सल संदीप यांच्या मनात होती. म्हणुनच त्यांनी संशोधन करायचा निश्चय केला. त्यांनी संशोधन करत स्वतःच्या नावाची कांद्याची जात शोधून काढली कांदा टिकवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.कांदा लवकर खराब होत असल्याने दरवाढीचा कधीही फायदा त्यांना झाला नाही म्हणूनच त्यावर पर्याय म्हणून त्यांनी आठ वर्ष संशोधन केलं आणि ‘संदीप कांदा’ या वाणाची निर्मिती केली. विशेष म्हणजे या नव्या वाणामुळे त्यांच्या उत्पन्नात हेक्टरी 7 ते 8 टणाचा फरक पडला आहे. मार्केटिंग करण्यासाठी संदीप घुले यांनी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केला.त्यामुळे त्यांच्यासोबत 8 राज्यातील जवळपास एक हजार पेक्षा जास्त शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत.त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखिले संदीप कांदा या वाणाची लागवड केली आहे.पाटस ता.दौंड येथील संदीप घोले या तरुण शेतकऱ्याने कांद्याबाबत एक नवीन पॅटर्न विकसित करून देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावचा हा तरुण शेतकरी आहे. त्याने कांद्याचे नवे ‘संदीप वाण’ विकसित केले असून या वाणाची टिकवणक्षमता 7 ते 8 महिने इतके आहे. त्यासोबतच या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे. विशेष म्हणजे या संशोधनासाठी संदीप घोले यांना 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. अनेकदा कांद्याचे बियाणे खरेदी करताना बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. ही सल संदीप यांच्या मनात होती. म्हणुनच त्यांनी संशोधन करायचा निश्चय केला. त्यांनी संशोधन करत स्वतःच्या नावाची कांद्याची जात शोधून काढली कांदा टिकवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
Home ताज्या-घडामोडी पाटस ता.दौंड तेथील तरुण शेतकऱ्याच्या भन्नाट संशोधनाने विकसित झाले कांद्याचे नवीन वाण....