👉 सर्वरोग निदान शिबीरात २४९ रूग्णांची तपासणी.
इंदापूर: पांडुरंगतात्या शिंदे हे नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी तात्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असते.याचा आनंद वाटतो.आपल्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा घडत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतानाच पांडूरंग (तात्या) शिंदे यांचे कार्य समाजाला प्रेरनादायी असल्याचे मत प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डाॅ.एम.के.इनामदार यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
भारतीय अमृत मोहोत्सवानिमित्त (दि.२४)रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने इंदापूर येथील सावतामाळी कार्यालयात मोफत सर्व रोग निदान शिबीर व महामानव जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी डाॅ.एम.के.इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,भाजपा ओबीसी मोर्चा पूणे जिल्हाध्यक्ष सागर भुमकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक अपर्णा जाधव,आरपीआय नेते नंदकुमार केंगार, डाॅ.रूषीकेश गार्डे, कैलास कदम,जयंतराव नायकुडे,माऊली चौरे,शकील सय्यद, नितीन आरडे,उज्वला राऊत इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
डाॅ.इनामदार पुढे बोलताना म्हणाले की जानेवारी महिन्यात सावित्रीबाई फुले,फातिमा शेख,जिजाऊ, स्वामी विवेकानंद,सुभाषचंद्र बोस जयंतीचे औचित्य साधून मोफत सर्वरोगनिदान शिबीर हा उपक्रम राबविणे तसेच प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त फातिमा नावाच्या पाच महिलांचा सन्मान करणे ही खरेतर अभिमानास्पद गोष्ट असुन सावित्रीबाई फुले,फातिमा शेख जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आजच्या महिलांनी वाटचाल करण्याचे आवाहन डाॅ.इनामदार यांनी केले.या शबीरात एकुण २४९ जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती पांडूरंग शिंदे यांनी दिली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मानचिंन्ह देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्षा नलीनीताई शिंदे,महिला दक्षता कमिटीच्या सदस्य सायरा आतार जयश्रीताई खबाले अनिता ताई खरात,पोलीस हवा.माधुरी लडकत,लताताई नायकुडे.माधवी सोननीस, डाॅ.अमोल उन्हाळे, शाबीर बेपारी, शिवराज भिसे,शेखर राऊत,दत्तात्रय गवळी,प्रकाश आरडे,जितेंद्र जाधव,अशोक व्यवहारे, सुनील राऊत, अमोल राऊत,अमजद बागवान,ओंकार हींगमीरे, इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन आकांशा दाभाडे व पत्रकार सुधाकर बोराटे यांनी केले तर आभार आशितोष शिंदे यांनी मानले.
👉 इंदापूरातील आरोग्य शिबीरात रूग्णांची तपासणी करताना डाॅ.एम.के.इनामदार,शेजारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,पांडुरंग शिंदे.
👉 आरोग्य शिबीर व महामानव जयंतीनिमीत्त उल्लेखनिय कार्य करणार्या महिलांचा सन्मानचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.👉 इंदापूरातील आरोग्य शिबीरात सहभागी डाॅ.एम.के.इनामदार व डाॅ.रूषिकेष गार्डे यांचाही सत्कार करताना पांडुरंग शिंदे.