इंदापूर :मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात वास्तव निर्भिडपणे वार्तांकन करणारे पत्रकार सुरेश मिसाळ व राहुल ढवळे यांना सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते निर्भिड पत्रकारितेचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
इंदापूरातील राधिका रेसिडेन्सी हॉल मध्ये मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्यदर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे,नीरा भीमाचे संचालक राजवर्धन पाटील,तहसिलदार श्रीकांत पाटील,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, जयंतराव नायकुडे(सर), आदी प्रमुख मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरम्यान राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून जिजाऊ,सावित्रीच्या लेकींना पत्रकार दिनाचे औचित्य साधून दोनशे पेक्षाही जास्त महिलांचा सन्मान करून इंदापूर पत्रकार संघाने समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केल्याचे दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान या वेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान्यूज लाईव्ह चे सुरेश मिसाळ, टीव्ही नाईनचे रिपोर्टर राहुल ढवळे यांचा निर्भीड पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर ज्येष्ठ पत्रकार म्हणून शिवाजी पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणारे युवा नगरसेवक स्वप्निल राऊत, नगरसेवक अनिकेत वाघ, दत्तात्रय सावंत (सर), आमचे मेंबर अनिल पवार, संतोष आरडे, दत्तात्रय जगताप,ॲड.रणजित बाबर,दिपक गुरगुडे,अनिल भांगे,समाधान गायकवाड यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात तालुक्यातील ७९ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक पत्रकार सुधाकर बोराटे यांनी केले,सुत्रसंचलन संतोष नरूटे यांनी केले व आभार प्रकाश आरडे यांनी मानले.