इंदापूर तालुक्यातील भाट निमगाव या गावचे पंजाबराव गायकवाड यांची इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्यामुळे इंदापूर तालुक्यामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडताना दिसत आहे. फोन द्वारे भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. आणि 11 जुलै रोजी झालेल्या इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये भाटनिमगावचे पंजाबराव गायकवाड यांची चेअरमन पदासाठी निवड झाली आणि व्हाईस चेअरमन पदी जाऊद्दीन शेख यांची निवड झाली. पंजाबराव गायकवाड यांचा तसा सगळीकडेच दांडगा जनसंपर्क असल्यामुळे आणि सामाजिक कामात त्यांचे एक पाऊल पुढे असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडताना दिसत आहे.पंजाबराव गायकवाड हे भाटनिमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचेही चेअरमन असून गेली दहा ते बारा वर्षे त्यांनी भाटनिमगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे कामही पाहिले आहे .पंजाबराव गायकवाड हे गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या अडचणी वेळी स्वतःला किती झळ बसते याचा विचार न करता गोरगरिबांच्या मदतीसाठी ते धावून जातात आणि या सर्व कामाच्या जोरावरच त्यांनी त्यांचा चांगल्या प्रकारे ठसा उमटवला आहे .आणि हीच दूरदृष्टी लक्षात घेऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आणि पंजाबराव गायकवाड यांच्याकडे चेअरमन पदाची धुरा हातात दिली. नुकताच भांडगाव ग्रामस्थांच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि आज अवसरी ग्रामस्थांच्या वतीने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शांतीलाल शिंदे, दत्तात्रेय मगर ,पत्रकार अंगत तावरे, घळके सर, रवींद्र काटे ,प्रवीण पवार( प्रगतशील बागायतदार), खंडू घनवट ,बाळू कुलकर्णी, बाबा झगडे ,अवसरी ग्रामपंचायतचे सदस्य आदित्य शिंदे, रणजीत शिंदे ,इत्यादी अवसरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंजाबराव( बापू) गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांना हार श्रीफळ फेटा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी भाट निमगाव मधील महादेव खबाले आकाश गायकवाड पत्रकार विजय शिंदे हे उपस्थित होते. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून पंजाबराव (बापू ) गायकवाड यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Home Uncategorized पंजाबराव (बापू ) गायकवाड यांना इंदापूर तालुक्यातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव.