निरा भिमा कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन उत्साहात
• इथेनॉल 1 कोटी 60 लाख लि.चे उद्दिष्ट
– 4 कोटी 50 लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट
इंदापूर: प्रतिनिधी दि.7/10/21
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या 21 व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नि-प्रदिपन समारंभ कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.7) उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते.
चालु गळीत हंगामामध्ये कारखाना 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. चालु गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
चालु हंगामात इथेनॉलचे 1 कोटी 60 लाख लि., उत्पादन घेण्यात येणार आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4 कोटी 50 लाख युनिट वीज एक्सपोर्ट चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच बायो-सीएनजी गॅस निर्मितीचा देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला प्रकल्प चालू वर्षी सुरू होत असून ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर चालणार आहेत. बायोगॅस प्रकल्पातून 15 लाख घन मीटर गॅस निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पाची क्षमता प्रतिदिनी 30000 लि. वरून 105000 लि. पर्यंत वाढवण्यासाठीसाठी विस्तारवाढीचे काम चालू होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा कारखान्याच्या संचालिका संगीता पोळ व दत्तात्रय पोळ या उभयतांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, विकास पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जामदार, माणिकराव खाडे, पांडुरंग शिर्के, एच.के.चव्हाण, सुनील अरगडे, के.एस. खाडे, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी सूत्रसंचालन केले.
____________________________