निर- निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल चा १३-० ने विजय.

प्रतिनिधी अक्षय खरात : निर- निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १७ जून रोजी पार पडली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रचारप्रमुख दत्तामामा घोगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व च्या सर्व १३ जागांवर विजय मिळवत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तसेच रणजीत दत्तात्रय घोगरे यांचा तब्बल २०० मतांनी दणदणीत विजय झाला आहे.निरा नदीच्या पट्ट्यातील निर निमगाव हे राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजले जाते.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे यांच्यासह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी हे गाव कायम उभे राहते. त्यामुळे यंदाच्या सोसायटी च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलला पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी खूप मोठी ताकद लावली होती परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी पुन्हा एकदा दत्तात्रय घोगरे यांच्यावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या पॅनलला निवडून आणले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दत्तात्रेय घोगरे वर्चस्व अबाधित राहिले आहे.
💥विजयी उमेदवार पुढील प्रमाणे:💥
👉 सर्वसाधारण मतदारसंघ-
रणजित दत्तात्रय घोगरे,ज्ञानदेव विठ्ठल गरगडे,आबा दादा जाधव, देवराज जयसिंग जाधव,चंद्रकांत रामचंद्र जाधव,बाळू तुळशीराम जाधव,अण्णा कुमार पवार वैजनाथ तुळशीराम साळुंखे
👉महिला प्रतिनिधी मतदारसंघ-
जयश्री विलास चांगण,संगीता मारुती गरगडे
👉भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ -निलेश देविदास देवडे
👉इतर मागास वर्ग- जाफर शहाबुद्दिन मुलाणी
👉अनु.जाती-जमाती मतदार संघ -सागर महावीर खरात

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here