निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला इंदापूर तालुक्यातून होतोय प्रचंड विरोध,शेतकरी करणार आक्रमक पद्धतीने आंदोलन.

शेळगाव : गेल्या काही महिन्यांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आंदोलनाच्या भूमिकेत असलेला पाहिला मिळाला आहे. मग यामध्ये विजेचा प्रश्न असेल किंवा शेटफळ हवेली येथील उचल पाणी परवानगी असतील परंतु आता एक नवीन विषयासंदर्भात इंदापूर तालुक्यातील शेतकरी भविष्यात मोठे आंदोलन उभा करतील असे चित्र निर्माण झाले आहे.जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या निरा डावा कालव्याला सिमेंटच्या अस्तरीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात आता इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेला दिसून येतो. कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरी कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण होऊ देणार नाही,असा इशाराच शेतकरी संघटनेने दिला आहे. शेळगाव (ता. इंदापूर) तेलओढा येथे मंगळवारी (दि. २३) श्री संत सावतामाळी मंदिरात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकर्‍यांची अस्तरीकरणाच्या विरोधात दिशा ठरविण्यासाठी पहिली बैठक झाली, यामध्ये हा इशारा दिला आहे. या वेळो पश्‍चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाले तर कालव्याच्या परिसरातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडून देशोधडीला लागणार आहेत. मागील आघाडी सरकारच्या काळामध्ये अस्तरीकरण करण्याचा चुकीचा निर्णय झाला आहे. शासनाने जर हे काम जबरदस्तीने केले तर शेतकरी हे काम बंद पडतील व त्यामध्ये आणखी दबाव शेतकऱ्यांवर आला तर शेतकरी मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार यात शंका नाही.”शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कोणताही निर्णय शेतकऱ्यांना विचारात घेऊनच करावा असेही शेतकरी नेते पांडुरंग रायते म्हणाले.
👉नक्की अस्तरीकरण का करत आहे शासन: अनेक शेतकऱ्यांनी कालव्यालगत जमिनी घेऊन तेथे विहिरी खोदल्या आहेत. ज्या ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका आहे, तेथे अस्तरीकरण केले जात असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात असले तरी, शेतकऱ्यांच्या मनामध्ये पाणी कमी पडण्याची भीती कायम आहे. कालव्याचे अस्तरीकरण न करता त्याची दुरुस्ती करावी, ज्या ठिकाणी कालवा फुटण्याचा संभव वाटतो, तेथे कालव्याची खोली अधिक करत अन उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. निरा डावा कालवा 152 किमी अंतराचा आहे. या कालव्याला मध्यंतरी बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर, पणदरे, पिंपळी आदी परिसरात गळती लागली होती. त्या कारणावरून कालवा फुटण्याची भीती जलसंपदा विभागाला आहे. त्यासाठी अस्तरीकरण केले जात आहे. 152 किमी अंतरापैकी 30 किमी भागाचे अस्तरीकरण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.खरंतर गेल्या वर्षापासून इंदापूर तालुक्यात शेतकरी व आंदोलन हे समीकरण आता सतत जुळायला लागले आहे कारण काही महिन्यापूर्वी ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कपात करून शासनाने शेतकऱ्याचे मुस्के आवळणे चालू केले होते त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात इंदापूर तालुक्यामध्ये विशाल आंदोलन झाले होते त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली शेटफळ हवेली येथील तलावावरील उचल पाणी परवानगीच्या विरोधात वकीलवस्ती येथे मोठ्या स्वरूपात रस्ता रोको आंदोलन झाले होते आणि आत्ताच्या काळात नीरा डावा कालव्याला सिमेंटचे अस्तरीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शेतकरी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यातच शेटफळ हवेली मधील तलावाच्या कॅनलचे अस्तरीकरण रोखण्यासाठी येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये शेटफळ हवेली येथील शेतकरी एकत्र येऊन शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात निवेदन देऊन आंदोलनाची तयारी करणार असल्याची माहिती संजय शिंदे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here