निमगाव केतकी- शेळगाव जि. प.व पंचायत समितीसाठी मिळणार नविन चेहरा ? 👉 माणिक (आबा) भोंग यांचे नाव आघाडीवर

  1. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ आणि पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यात जि. प. निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने जि. प. सदस्य होण्यासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.तालुक्यामध्ये २ जि. प. सदस्य वाढले आहेत. याआधी ७ संख्या होती, ती आता ९ झाली आहे तर पं. स.चे १४ ऐवजी १८ गण झाले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणाचा मागोवा घेतल्यास यावेळची निवडणूक अटीतटीची होणार आहे. पंचायत समिती साठी सर्वसाधारण उमेदवार मोठ्या प्रमाणात रिंगणात येणार असल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे. निमगाव केतकी-शेळगाव गटामध्ये मोठा संघर्ष दिसणार आहे. या ठिकाणी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती श्री अंकुश जाधव यांचे जावई व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मा.श्री.माणिक (आबा) भोंग यांचे नाव चर्चिले जात आहे. मध्यंतरी त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची विकासकामे केलेली आहेत.निमगाव केतकी मतदार संघामध्ये सुमारे १२ ते १३ हजार मतदार असून यामध्ये निमगाव केतकी मधील सर्वात जास्त मतदार आहेत.त्यामध्ये भोंग घराण्यातील सर्वात जास्त मतदान आहे.त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निमगाव केतकी मधूनच उमेदवार द्यावा लागणार आहे.आणि तो उमेदवार देताना भोंग घराण्यातील उमेदवारांचा समावेश दोन्ही पक्षांना करावा लागणार आहे.जो पक्ष भोंग परिवारातील उमेदवार उभा करेल त्याच पक्षाचा झेंडा या मतदार संघावर फडकणार आहे,हे पण विसरून चालणार नाही.त्यामुळे निमगाव-शेळगाव गटामध्ये माणिक (आबा) भोंग यांचे नाव चर्चेत आहे. याबरोबरच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव यांचे चिरंजीव, निमगाव केतकीचे माजी उपसरपंच तुषार जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ तात्या डोंगरे यांचे चिरंजीव व निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रविण डोंगरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, संजय राऊत, सचिन चांदणे, सचिन जाधव, संदीप भोंग,बाबजी भोंग आदींची नावे चर्चेत येऊ लागली आहेत.निमगाव गटात यावेळी मोठी चुरस होणार आहे.निमगाव गट हा हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी सर्वसाधारण उमेदवार असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवराज (भाऊ) जाधव यांचेही नाव चर्चेत असून गतवेळी निमगाव जि.प.गटातुन हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी भारतीताई दुधाळ,तर पंचायत समितीसाठी देवराज भाऊ जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती.त्याच वेळी भोंग परिवारातील सदस्यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज भोंग गटातून निमगाव केतकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य माणिक (आबा) भोंग यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई भोंग यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना माणिक (आबा) भोंग व इतर भोंग परिवार यांची समजूत काढण्यात यश आले होते, या मतदार संघाचे राजकारण नेहमी निमगाव केतकी मधील जाधव,भोंग, डोंगरे या कुटुंबाच्या निर्णयावर अवलंबून असते. परंतु यावेळी मात्र राजकीय परिस्थिती वेगळी आहे.काहीही झाले तरी यावेळी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीवर भोंग परिवारातील सदस्य निवडून जाणारच असा पवित्रा भोंग परिवाराने घेतला आहे.
    या गटामध्ये देवराज भाऊ जाधव व अंकुश दादा जाधव यांची पकड मजबूत आहे.त्यामुळे हर्षवर्धनजी पाटील साहेब व माजी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे हे या गटामध्ये पुन्हा एकदा घराणेशाही ला उमेदवारी देणार का नविन युवक उमेदवारांना संधी देऊन कशी रणनिती आखणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    👉माणिक (आबा) भोंग यांच्या उमेदवारीचा होणार फायदा:
    निमगाव गटातून जो पक्ष माणिक (आबा) भोंग यांना उमेदवारी देईल त्या पक्षाला संपूर्ण गटामध्ये राजकीय फायदा होणार आहे.माणिक (आबा) भोंग हे पंचायत समितीचे माजी सभापती व निमगाव केतकी गटाचे किंगमेकर मा.श्री.अंकुश (दादा) जाधव यांचे जावई असून या मतदार संघामध्ये जाधव व भोंग कुटुंबाला मानणारा लोक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here