👉 सत्तेतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी केली विकासकामांबाबत तक्रार..
निमगाव केतकी(इंदापूर ता.प्रतिनिधी.सचिन शिंदे): निमगाव केतकी येथे राज्यमंत्री भरणे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जात असून त्या निधीमधून होणारी कामे ही गुणवत्तापूर्वक होत नसल्याचे निदर्शनास येत असून त्याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या ताब्यात असलेल्या निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत येथील सत्तेतील विद्यमान सदस्य तक्रारी करत असल्याने विकास कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत सदस्य अजित मिसाळ यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून वार्ड क्रमांक एक मधील शिवाजीनगर येथे झालेल्या खडीकरण व मुरमीकरण हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामात खडीकरणाच्या वरचा मुरमाचा थर हा लाल माती मिश्रित असून हे काम टिकाऊ व दर्जेदार नसून दर्जाहीन स्वरूपाचे असून केवळ पैसे खाण्याच्या हेतूने हे काम करण्यात आले असल्याचा आरोप मिसाळ यांनी या अर्जात केला आहे.वारंवार ग्रामपंचायत सदस्यांकडून होत असलेल्या तक्रारीवरून गावकरी संभ्रमात आहेत.
👉 विकास कामांचा नावाखाली गैरव्यवहार होत आहे का?
👉 निमगाव केतकी येथील त्यांच्याच पक्षातील ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत आहेत का?
👉 ही विकास कामे टक्केवारीची तर नाहीत ना?
👉 या ग्रामपंचायतीमध्ये दडपशाहीचे राजकारण चालू आहे का?
👉 राज्यमंत्री भरणे यांचे या ग्रामपंचायतीवर नियंत्रण आहे का?राज्यमंत्री भरणे या गोष्टीकडे लक्ष देणार का?
👉 अशे एक ना अनेक प्रश्न सध्या निमगांव केतकी येथील सर्वसामान्य जनतेला पडले असून यासंदर्भात गावात चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे.