निमगाव केतकी, ता.1. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बद्दल मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह विधान केलेच्या निषेधार्थ आज निमगाव केतकी येथे रस्ता रोको आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भिडे यांच्यावरती इंदापूर पोलीस स्टेशन येथे खटला दाखल करून त्यांना अटक करावी अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.
इंदापूर तालुका माळी परिषद व फुले प्रेमी नागरिक यांच्या वतीने इंदापूर बारामती रस्त्यावर व्याहळी चौकात आज सकाळी नऊ वाजता भिडे यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भिडे यांच्यासह मणिपूर येथील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
भिडे हे जाहीरपणे महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त विधाने करत आहेत .असे असताना सरकार त्यांना पाठीशी का घालत आहे असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. यामागे कोणाची विचारधारा आहे याचा देखील शोध घेतला पाहिजे.
फुले यांच्या बद्दल भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यातील लोकांच्या सामाजिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शासनाच्या वतीने फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी तसे न केल्यास पोलीस निरीक्षक यांनी निवेदनाच्या आधारे इंदापूर पोलीस स्टेशन येथे भिडे यांच्याविरुद्ध खटला दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी इंदापूर तालुका माळी परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट कृष्णाजी यादव, सरपंच प्रवीण डोंगरे, माजी सभापती अंकुश जाधव, कर्मयोगी कारखान्याचे संचालक राहुल जाधव, सावता परिषदेचे संघटक संतोष राजगुरू, बहुजन समाज पार्टीचे अजित ठोकळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अतुल मिसाळ, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोंग, माळी महासंघाचे अमर बोराटे, किरण म्हेत्रे , संतोष हेगडे, शशिकांत शेंडे यांनी भिडे यांचा जाहीर निषेध केला.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव माजी सभापती दत्तात्रय शेंडे, उद्योजक वसंत मोहोळकर, कर्मयोगी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर, सहकार महर्षी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, मोहन दुधाळ, निवृत्ती गायकवाड, तात्यासाहेब वडापुरे, गोरख आदलिंग, माणिक भोंग बबन खराडे, संदीप भोंग, सचिन राऊत, छगन भोंगळे, मच्छिंद्र अभंग, बळी बोराटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार धोतरे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटोळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भिडे यांच्या पुतळ्यास जोड मारून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
Home Uncategorized निमगाव केतकी येथे गावकऱ्यांनी इंदापूर- बारामती रोडवर रास्ता रोको आंदोलन करत संभाजी...