निमगाव केतकी/ इंदापूर प्रतिनिधी:- सचिन शिंदे
शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी शिवसेना जन संपर्क कार्यालय इंदापूर येथे शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते व जिल्हा समन्वयक विशालदादा बोन्द्रे, तालुका प्रमुख नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत निमगाव केतकी येथील युवा कार्यकर्ते सोमनाथ शेंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाला ही याचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी बोलताना सोमनाथ शेंडे म्हणाले की पक्ष वाढीकरिता यापुढे मी व आमचे सहकारी निश्चित प्रयत्न करू व शिवसेना पक्ष घरा-घरात पोहचवू..
यावेळी सोमनाथ शेंडे यांच्यासोबत शेखर शेंडे, गणेश काळे, पांडुरंग सलगर, स्वप्नील शेंडे, रणजित शेंडे, वैभव शेंडे, शुभम काळे, नवनाथ शेंडे, दादाराम बोराटे, सोमनाथ विष्णू शेंडे, बबलू बनकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या सर्व तरुणांचे जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.