नितीन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची विविध विषयांवर चर्चा..

इंदापूर : केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे रविवारी (दि.16) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
सध्या संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. जून महिन्यामध्ये पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे ना.नितीन गडकरी यांनी या पालखी मार्गाची पाहणी करणे विषयी भेटीत चर्चा झाली. तसेच इंदापूर तालुक्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या माध्यमातून व भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे चालू आहेत तसेच अनेक नवीन विकास कामांना राज्य व केंद्र सरकारने मंजुरी व कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजनांचे निमंत्रणही या भेटीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ना. नितीन गडकरी यांना दिले. याबरोबर नवीन इतर विकास कामांवरही नितीन गडकरी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी चर्चा केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here