नातेपुते: नातेपुते दिनांक १५ जानेवारी नव्याने स्थापन झालेल्या नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित चार प्रभागासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून दि १८ रोजी मतदान आहे,नातेपुते येथे अत्यंत चुरशीच्या लढती होत असून सर्वांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे,यापूर्वी डिसेंबर महिन्यात १३ जागांसाठी मतदान झाले होते सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षण बाबतच्या निकालानंतर आता चार जागांसाठी निवडणूक होणार आहे,यात १७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत यात जनशक्ती पॅनल नागरिक विकास आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्ष समाज भूषण पॅनेल व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत उमेदवार व पॅनल प्रमुखांच्या पदयात्रा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटी व जाहिरात प्रचार सुरू आहे.