सोलापूर:नुकतीच सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि.सोलापूरची पंचवार्षिक निवडणूक पार पडली.असोसिएशनच्या पहिल्या मीटिंगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बँकाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारीचे प्रतिनिधी संचालक म्हणून दिनकर देशमुख यांना स्वीकृत करण्यात आले.बॅंकींग क्षेत्रातील अभ्यासू आणि तज्ञ व्यक्तिमत्त्व व अल्पावधीत नावाजलेल्या श्री समर्थ पतसंस्थेचे संस्थापक व विद्यानंद बँकेचे सीईओ,श्री दिनकर देशमुख यांना बँकिंग क्षेत्रामध्ये 25 वर्षाचा अनुभव आहे. याचा विचार करून त्यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी नवनियुक्त संचालक दिनकर देशमुख म्हणाले की, “जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी कटीबद्ध असणार आहे,त्याचप्रमाणे नागरिक सहकारी बँकांना वसुलीसाठी येणाऱ्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी दिनकरराव देशमुख यांनी सांगितले.. या निवडीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष श्री अशोक लुनावत, उपाध्यक्ष श्री प्रकाश वाले, संचालक श्री राजगोपाल मणीयार, श्री दिपक मुनोत, किसन माळी, असोसिएशनचे सर्व संचालक व विद्यानंद बँकेचे चेअरमन सुधीर गांधी यांनी श्री दिनकर देशमुख यांचे अभिनंदन केले.
Home Uncategorized नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध-दिनकरराव देशमुख,सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या स्वीकृत संचालक...