” नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये.” भारतीय सैन्य यांच्याकडून महत्वाच्या सूचना..नेमका काय प्रकार वाचा सविस्तर

कार्यकारी उपसंपादक: गणेश घाडगे
काश्मीर बाहेरच्या लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार दहशतवाद्यांनी सुरु केले आहेत. यामुळे युपी, बिहारचे लोक आपापल्या गावी परतू लागले आहेत. ही दहशत मोडून काढण्यासाठी भारतीय जवानांनी मोठी मोहिम सुरु केली असून नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, अशा सूचना करण्यात येत आहेत.
भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर अखेरचा प्रहार करण्य़ास सुरुवात केली आहे. लपलेले दहशतवादी स्थानिकांचा फायदा घेऊन पळून जाऊ नयेत म्हणून भारतीय जवानांनी पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात लोकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आजुबाजुच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी सैन्याने मोठी मोहिम सुरु केली आहे. यासाठी मशिदींच्या भोंग्यावरून घरातून बाहेर पडू नका, असे सांगितले जात आहे.
नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये आणि जंगलाच्या दिशेने मुळीच जाऊ नये, आपल्या पाळीव प्राण्यांना घरातच ठेवावे. जे लोक आधीच बाहेर गेले आहेत त्यांनी लवकरात लवकर परतावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पूँछ आणि राजौरी भागात हे ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना पकडण्य़ासाठी संपूर्ण भागात सैन्याने वेढा घातला आहे. पॅरा कमांडो आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खतरनाक जंगल :
हा परिसर डोंगररांगांचा आहे आणि जंगलही घनदाट आहे. यामुळे भारतीय आर्मीने जी मोहिम हाती घेतली आहे ती खूप धोकादायक आहे. पूंछच्या सूरनकोटमध्ये 12 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. 14 ऑक्टोबरला आणखी दोन जवान शहीद झाले होते. तर 16 ऑक्टोबरला पुन्हा एक जेसीओ आणि एक जवान शहीद झाले होते.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here