इंदापूर: सध्या चीनसह इतर देशामध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 ची भीती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले आहे.राजवर्धन पाटील म्हणाले की,’ कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असुन या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घ्यावी. योग्य खबरदारीच्या आधारे हे संकट टाळता येईल.
Home Uncategorized नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख...