नवी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमितजी शाह यांना महाराष्ट्रातील शिष्टमंडळ भेटले.

– मा.अमितजी शाह यांचेबरोबर बैठक
साखर उद्योग प्रश्नी सकारात्मक चर्चा..
इंदापूर:नवी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमितजी शाह यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.19) भेट घेतली. या भेटीत साखर उद्योग प्रश्नी सकारात्मक चर्चा झाली.
राज्यतील साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटिसा व सहकारी साखर कारखान्यांना करावयाच्या मदतीस संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडीक, राहुल कुल, पृथ्वीराज देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, मदन भोसले आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल,असे बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नमूद केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here