👉 बारामती लोकसभा मतदार संघाचा भेटीत आढावा.
इंदापूर : प्रतिनिधी दि.23/1/23
नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि.23) भेट घेतली. या भेटीत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा झाली.
निर्मला सीतारमन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सप्टेंबर महिन्यात दौऱ्यावरती आलेल्या होत्या, सदर दौऱ्याचा आढावा या भेटीत घेण्यात आला. तसेच निर्मला सीतारमन यांच्या आगामी बारामती दौऱ्यांविषयी या भेटीत चर्चा झाली. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातील विकास कामे, अडी-अडचणी या संदर्भातही निर्मला सीतारमन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेटीत सविस्तरपणे चर्चा झाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देशातील जिंकता येणाऱ्या 144 लोकसभा मतदारसंघांमध्ये बारामतीचा समावेश केलेला आहे, या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.
Home Uncategorized नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची चर्चा.