धनगर प्रबोधन संघाचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते ॲड. गोविंदराव देवकाते यांनी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मुंबई महाराष्ट्र उपाध्यक्ष- पुणे जिल्हा श्री .अशोक देवकते यांच्या पुणे येथील स्वगृही सदिच्छा भेट दिली.धनगर जमातीच्या पराक्रमी महापुरुषांचा वैभवशाली इतिहास छत्रपती शिवरायांचे पराक्रमी सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते व होळकर शाहीचा पराक्रमी इतिहास उलगडून सखोल मार्गदर्शन केले. तसेच धनगर जमातीच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय वैचारिक व व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या समाजाला भक्कम करण्यासाठी एक रचनात्मक उभारणी करून अखंडपणे कार्य करून धनगर जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघ असा प्रगल्भ रचनात्मक संघटन आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.तसेच धनगर जमातीला अलौकिक गौरव शाली पराक्रमी इतिहास असताना एक लढवय्या पराक्रमी धनगर जमात गेल्या 70 वर्षांपासून संविधानाने दिलेल्या न्यायहक्कासाठी धनगर ST आरक्षणासाठी आंदोलने रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढत आहेत परंतु या राजकीय प्रस्थापित व्यवस्थेने धनगर जमातीला त्यांच्या सर्वांगीण विकास न्याय हक्कापासून दूर ठेवले अंधारात ठेवले असे मत श्री अशोक देवकाते यांनी मत व्यक्त केले.प्रसंगी समाजाला अन्यायाच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर अभ्यासू वकील इतिहास अभ्यासक उत्कृष्ट अभ्यासू लेखक माहिती अधिकार कार्यकर्ते यांची फळी तयार व्हायला हवी तसेच पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यामध्ये आपला दबदबा निर्माण व्हायला हवा असे मत श्री पांडुरंग देवकाते( एसीबी पुणे ) यांनी व्यक्त केले. यावेळी युवा नेते भाजपा यांचा शाल श्रीफळ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन श्री पांडुरंग देवकाते व पुण्यश्लोक प्रतिष्ठान चे जेष्ठ संचालक श्री .तेलगे घेनप्पा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील राजकीय उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थित संकल्प उद्योग समूहाचे संचालक श्री. संतोष देवकाते सामाजिक कार्यकर्ते व मनसे कार्यकर्ते श्री हरिभाऊ वैद्य व महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंचाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक देवकाते उपस्थित होते.