आमदार रमेश लटके यांचं दुबई मध्ये निधन. 

 मुंबई:(प्रतिनिधी वैभव पाटील)शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. रमेश लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्यासाठी गेले होते.त्यादरम्यान ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे रमेश लटके यांचं निधन झालं. रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून दु:ख व्यक्त केलं जात आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. आमदार रमेश लटके कुटुंबीयांसह दुबईला गेले होते.तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाईल.रमेश लटके हे अंधेरी पुर्व विभागाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिक आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here