दौंडमधील छेडछाड प्रकरणाचे पडसाद आता इंदापूर तालुक्यातही, मंगळवारी प्रथमच खाटीक समाज उतरणार रस्त्यावर. वाचा सविस्तर

दौंड मधील मारहाण व छेडछाड प्रकरण हे सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार राणे यांनी स्वतः दौंडमध्ये येऊन झालेल्या प्रकाराविषयी निषेध व्यक्त केला होता व प्रशासनास अल्टिमेटही दिला होता. आता याच प्रकरणाचे पडसाद  इंदापूर  तालुक्यातही उमटू लागले आहेत.
दौंड येथील खाटीक समाजातील भगिनीची छेडछाड करुन मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच घोलप व जमदाडे रा. दौंड, जि. पुणे या दोन कुटूंबियांना मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन गाव सोडून जाण्यास धमकी देण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज दि.22 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी इंदापूरमध्ये सर्व खाटीक समाज प्रथमच रस्त्यावर उतरणार आहे.उद्या हिंदू खाटीक समाज इंदापूर शहर यांच्या वतीने शहरातून मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता खाटीक गल्लीतून सुरू होणारा हा मोर्चा कांबळे गल्लीतून हायवे मार्गे तहसीलदार ऑफिसला पोहोचणार आहे.विशेष म्हणजे इंदापूर शहरांमधून निघणाऱ्या या मूक मोर्चामध्ये दौंडमधील पीडित कुटुंबाचाही सहभागी होणार असल्याने या मोर्चाचे आता महत्त्व वाढले आहे.
दौड येथील पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या माजी नगराध्यक्ष बादशहाभाई शेख यांचेसह ८ जणांवर अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचा विनयभंग केला म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या तीन जणांना तलवार, कोयते घेऊन मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. या कारणावरून दौंड माजी नगराध्यक्ष बादशहाभाई शेख, ईलास इस्माईल शेख, राशिद इस्माईल शेख, आरबाज सय्यद, वाहिद खान, जुम्मा शेख, वसिम शेख, जिलानी शेख व इतर १० ते १२ जणांवर दौंड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अधिनियम ३(१) नुसार अँट्रॉसिटी आणि मारहाणीचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सबंधित गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी इंदापूर शहर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येणार आहे.एकंदरीतच दौंड मधील घडलेला हा प्रकार फक्त दौंड तालुक्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून आता इतरही तालुक्यात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. म्हणून आता प्रशासनयाकडे कसे लक्ष देईल व उर्वरित संबंधित मुख्य गुन्हेगारांना कधी पकडणार? याकडेच महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here