प्रतिनिधी – महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, ता.दौंड येथील महावितरण च्या वीज वितरण उपकेंद्रात असणारा मुख्य 10 मेगावॉट पॉवर ट्रान्सफॉर्मर जळला असल्याने 3 फेज शेतीपंपचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
देऊळगाव राजे व आसपासच्या परिसरात ऊस पीक प्रामुख्याने घेतले जाते, सद्या आडसाली लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. लागवडी साठी पूर्व मशागत करून बियाणे तोडून रानात येऊन पडले असताना विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.यामुळे बियाणे सुकून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या वर्षी कापूस आणि उडीद ही खरीप (पावसाळी) हंगामी नगदी पिके घेतली आहेत .अशात पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी देण्याची आवश्यकता आहे.याही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे .
तसेच परिसरातील तुरळक ठिकाण वगळता इतर बऱ्याच ठिकाणी अवशकते नुसार मोठा पाऊस झालेला नाही, यामुळे अजून उन्हाळा सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे उसाच्या सुरु लागण आणि खोडवा पिकांन्ना पाण्याची गरज असताना विद्युत पुरवठा खंडित असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
देऊळगाव राजे विद्युत उपकेंद्रातील 10 मेगावॉट ट्रान्सफॉर्मर गुरुवार पर्यंत उपलब्ध होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल तो पर्यंत प्रत्येक शेतीपंप फिडर ला दोन दोन तास वीज पुरवठा करण्यात येईल.अशी माहिती उपभियांता महेश धावडे यांनी दिली .