प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे ता.दौंड 2 वर्ष जागतिक महामारी कोरोणा मुळे एकदम साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करावी लागली या वर्षी सरकारने सर्व निर्बंध हतवले असल्यामुळे शिवजयंती उत्सव समिती ने ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. (१ मे) शिवज्योत तोरणा कील्यावरून आणण्यासाठी देऊळगाव राजे येथून प्रस्थान करून किल्ल्यावर मशाल ज्योत प्रज्वलीत करून (२ मे) शिवजयंती दिवशी गावात ज्योत पोहचउन रात्री शिवरायांचा पाळणा व आरती पवार महाराज यांनी केली पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.दुसऱ्या दिवशी (३ .मे) ह.भ.प.डॉ.प्रा. गजानन महाराज वाव्हाळ यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले.व आज सायंकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा) घेण्यात आला आहे. ४ दिवसाच्या या उत्सवामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. लहान थोरांपासून महिला भगिनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. भागवत सूर्यवंशी,केशव गिरमकर,भागवत आवचर,मदन खेडकर,गणेश कुंभार,वाल्मीक आवचर व सर्व तरुण मंडळ यांनी नियोजन केले .