इंदापूर: आज दि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या इंदापूर कार्यकारणी मध्ये इंदापूर उपशहराध्यक्ष पदी युवानेते योगेश गुजर यांची नियुक्ती करण्यात आली असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे तालुका अध्यक्ष शिवराज पवार यांच्या हस्ते व शहराध्यक्ष अशोक देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योगेश गुजर यांना पत्र देण्यात आले. नुकतेच दि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या हस्ते इंदापूर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालेले होते त्यानंतर तालुक्यातील युवावर्ग यांच्यात उत्साह निर्माण झालेला दिसून आला होता. अनेक युवक येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटामध्ये सामील होणार आहेत या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घराघरात पोहोचवणार आहे अशी माहिती शिवराज पवार यांनी दिली. येणाऱ्या काळात शहरांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काम घराघरात पोहचू व शहरात आणखी शाखा स्थापन करू असा निश्चय यावेळी योगेश गुजर यांनी घेतला या कार्यक्रमाच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये साजन ढावरे,राहुल देवकर, नाना क्षीरसागर,इरफान बागवान,मिलन पवार, ऋषिकेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.