जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी अजय तोडकर मो.7776027968
केडगाव : आमदार अँड. कुल यांच्या संकल्पनेतून कै. सुभाषआण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, दौंड, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व उपजिल्हा रुग्णालय, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने बोरमलनाथ मंदीर, बोरीपार्धी, चौफुला, ता. दौंड येथे आयोजित दिव्यांग मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पूर्णत: किंवा अंशतः शारीरिक व्यंग, अस्थिव्यंग किंवा नेञव्यंग असलेल्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सुविधा व सवलतींचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग नागरिकांची तपासणी व अपंगत्व प्रमाणपत्र (UDID कार्ड) नोंदणीसाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३०० हून अधिक दिव्यांग बांधवानी शिबिरामध्ये सहभागी नोंदवला.
यापूर्वी दि १० जुलै २०२१ रोजी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना मोफत मोटाराईज ट्राय सायकल वाटप तपासणी शिबिराचे आयोजन आमदार अॅड. कुल यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामध्ये पात्र ठरलेल्या ४४ दिव्यांग बांधवाना बॅटरीवरील स्वयंचलित सायकलचे वाटप देखील लवकरच करण्यात येणार असून, मागील वर्षी डिसेंबर २०२० मध्ये देखील आमदार अॅड. कुल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मेळाव्यात सुमारे ३५० हून अधिक दिव्यांगांना मोफत UDID कार्ड मिळवून देण्यात आल्याचे आमदार अॅड. कुल यांनी यावेळी सांगितले.
शिबीरासाठी दौंड उपजिल्हा रुग्नालायाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. दिनेश वानखडे, नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. शेंडकर , श्री. शिंदे व दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुल, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव नाना बारवकर, संचालक तुकाराम ताकवणे, विकास शेलार, अरुण भागवत, चंद्रकांत नातू, माजी जि. प. सदस्य मोहन म्हेत्रे, नीलकंठ शितोळे, दादासो केसकर, कैलास शेलार, सोमनाथ गडधे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, डॉ. आव्हाड, संभाजी खडके उपस्थित होते. प्रा. दिनेश गडधे यांनी सूत्रसंचालन केले व भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड. बापू भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आमदार अॅड. कुल यांचा नेहमीच दिव्यांग बांधवांना आधार*
आमदार अॅड. राहुल कुल यांनी कोरोनासारख्या भीषण महामारीच्या काळात आमच्या सर्व दिव्यांग बांधवांना मदत केली असून, संजय गांधी निराधार योजना, एस. टी बस पास मोफत वाटप तसेच इतर अनेक शासकीय योजना, सार्वजिक, वैयक्तिक कामे व अपंग मेळाव्याचे आयोजन करून, तसेच दिव्यांग बांधवाना बॅटरीवरील स्वयंचलित सायकल वाटप आमदार अॅड. कुल यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने, त्यांनी आम्हाला संकट काळात नेहमीच खूप मोठा आधार दिला असल्याचे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप व तालुकाध्यक्ष बाळासाहेब नानवर यांनी यावेळी सांगितले.