शवविच्छेदन गृहाबाहेर मानवी अवयव विल्हेवाट प्रकरणात अनेक गैरप्रकार उघड होणार ?
इंदापूर: इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहाच्या आवारात मानवी शरीरातील अवयव उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास येऊन ते मानवी अवयव मोकाट जनावरे खात असल्याचा किळसवाणा प्रकार नुकताच इंदापूर येथे घडला असून याची बरेच वृत्तपत्रांनी दखल घेऊन हा प्रकार जगासमोर आणला. सदर घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठ पातळीवरून डॉ. संजीव कदम उपसंचालक आरोग्य विभाग पुणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी एच. ओ. डी. पुणे, डॉ. अशोक नांदापूरकर शल्य चिकित्सक पुणे यांच्या पथकाकडून इंदापूर उपजिल्हा रुग्णालय परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर नांदापूरकर यांनी सांगितले की या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांचे स्वतःच्या खाजगी दवाखाना, हॉस्पिटल सुरू असल्यास संबंधित डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात सेवा बजावता येणार नाही. अशा प्रकारची घटना कोठेही घडली नाही किंवा निदर्शनास आली नाही आणि असा प्रकार कोठे घडत असेल व याबाबत कोणाची तक्रार असल्यास त्याबाबत निश्चित कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मात्र याबाबतची तक्रार महिन्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ यांनी डॉ. नांदापूरकर यांच्या कार्यालयाकडे केली होती. परंतु या तक्रारीकडे गांभीर्याने घेतले गेले नाही आणि इंदापूर पत्रकार परिषदेत कार्यवाही बाबत बोलणे हे धक्कादायक असून डॉ. नांदापूरकर हेच शासकीय दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या खाजगी हॉस्पिटल चालवण्यात पाठीमागे आहेत काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आता दालमे कुछ काला है? या पुरी दाल ही काली है? अशी म्हणण्याची वेळ इंदापूरकरांवर वर आलेली आहे. इंदापुरातील डॉ.सुहास शेळके व डॉ. नामदेव गार्डे यांची शासकीय सेवेत असताना देखील खाजगी हॉस्पिटल आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळीच उपचार घेता येत नसून त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. परंतु त्यांच्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही होताना दिसली नाही. अशा डॉक्टरांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होताना दिसत आहे
एक महिन्यापूर्वी डॉ. सुहास शेळके हे सरकारी हॉस्पिटल ला श्रेणी एकचे कर्मचारी असताना देखील ते खाजगी हॉस्पिटल चालवत असल्याबाबत ची तक्रार दिली होती. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही. यावरून असे दिसुन येते की डॉ.नांदापूरकर व डॉ.शेळके यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. इंदापूर या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मध्ये असलेले जेवढ्या डॉक्टरांचे खाजगी हॉस्पिटल आहेत हे नांदापूरकर यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.
– दत्तात्रय मिसाळ निमगांव केतकी
रुग्णालयाच्या आवारात नांदापुरकर यांची गाडी दाखल होताच मागून एक अनोळखी व्यक्ती “आला हफ्ता खाऊ” असे ओरडला होता. हा आवाज काही पत्रकारांनाही ऐकू आला होता. २५ नोव्हेंबर रोजी मिसाळ यांनी वैद्यकीय अधीक्षक पदावर असूनही डॉ. सुहास शेळके रुग्णालयाच्या गेटवरच आपला खाजगी दवाखाना चालवत असल्याची तक्रार देऊनही २८ डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नांदापूरकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खाजगी दवाखाने असल्याची कोणी तक्रार दिल्यास कारवाई करू असे दिलेले उत्तर सर्व हकीकत स्पष्ट करत आहे का?